मंथन
ज्यांच्या असण्याला अर्थ असतो त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते
Thursday, October 14, 2010
स्वप्न
खरचं मन जे विचार करतं प्रत्येकक्षात कधी घडत नाही
जे भाग्याला मान्य असतं तसं स्वप्नही आपल्याला पडत नाही................
.......
स्वप्ने ही आपलीच असतात
ह्र्दयात त्यांना जपायची असतात
Wednesday, July 7, 2010
मैत्री म्हणजे.......
मैत्री म्हणजे.......खांद्यावर हात
मैत्री म्हणजे.......सदैव साथ
मैत्री म्हणजे.......वाट पाहणे
मैत्री म्हणजे.......सोबत राहणे
मैत्री म्हणजे........एकत्र फिरायला जाणे
मैत्री म्हणजे........एकत्र आईस्क्रीम खाणे
मैत्री म्हणजे........सल्ले घेणे
मैत्री म्हणजे........मार्ग देणे
मैत्री म्हणजे........कधी राग
मैत्री म्हणजे........कधी भडकते आग
मैत्री म्हणजे........कधी खरी कधी खोटी
मैत्री म्हणजे........कधी पड़ते छोटी
मैत्री म्हणजे........आजचं सत्य
मैत्री म्हणजे........नसेलच नित्य
मैत्री म्हणजे........लिहावं तेवढं कमी
मैत्री म्हणजे........सुखातच साथीची हमी
खूप पाऊस पडतो तेव्हा .....
जीव सोडला आहे.... तरीही काळीज रडतंय... काळीज रडतंय.....!!
मी म्हंटल
"
अगं मी काहीही करेन
तुझ्यासाठी
तुला हसतं
पाहण्यासाठी
,
तुझी आस्व
पुसण्यासाठी
तू फक्त होय
म्हण ग
,
जीव तुझ्यातच गुंतलाय सारा
"
तिनेही
लाजत म्हंटल
"
हो राजा मी तुझीच आहे रे
,
माझ्याही श्वासाला गरज
तुझीच आहे रे
"
मग कसं कोण जाने
,
ती माझ्या मिठीत विरून गेली
,
विर्घळूनच गेली
,
अगदी
माझ्याही नकळत!!
आता मी मी राहिलो नव्हतो
,
न ती ती उरली होती
दोघानाही आता
ओढ लग्नाची लागली होती..
मग न जाने का
,
नजर माझीच लागली
.....
मी तिला अचानक माझ्या लग्नाची खबर सांगितली
अन थोड्याच वेळात रूम तिची
गाठली
,
पत्रीकेसोबत
त्या
भाबडीने हात तिचा कापला होता ..
मी जाण्यापूर्वी श्वास कधीच
सोडला होता...
पुन्हा येऊन पाहून जा ग
पत्रिका आहे आपल्याच
लग्नाची ..
सोंग केलं होतं ग मी सारं...
फक्त तुला जळवण्यासाठी ..
ग
प्रिये थोडं
जळवण्यासाठी..
आज तिच्या प्रेतासोबत
माझंही प्रेत जळतंय...
जीव सोडला आहे....
तरीही
काळीज रडतंय...
काळीज रडतंय........
भर पावसात . . . . . . .माळशेज घाटात....
Tuesday, July 6, 2010
राख माझ्या प्रेताची .........
तुला दिलेली वचनं
मी माझ्या मनापासून पाळले होते...
तू नाही ठेवली किम्मत त्यांची
म्हणुन काल मी माझे प्रेत जाळले होते...
झाली होती गर्दी फार
जळतान्ना मला पहायला...
काही जनांना घाई फार
राख़ नदित वहायला...
आग पूर्ण विझली तरी
प्रेत माझे जळतच होते...
राख़ वेचनार्यांचे काल
हाथ आगिने सलत होते...
राख़ अजूनही गरम होती
'' उद्या वाहू '' म्हणुन गेले...
अश्रु दोन गालुन
मागच्या मागे वलुन गेले ....
मग... भल्या पहाटे
कुणीतरी तिच्या स्पर्शासम उब देत होत्तं...
मी उठून पाहिले तर
शेजारी एक प्रेत जळत होत्तं...
आलेत मागोमाग राख़ वेचनारे
वेचुन मला त्यांनी घरी नेले...
सोबतच वाहुया आतातरी
अनोळखी कुजबूज करून गेले ...
नदिकाठी आज माझ्या
एक राख़ मडकी होती शेजारी...
माझ्या सारखेच तिचे रूप
जणू काही म्हणत होती बिचारी ...
नदीमधे मग त्यांनी
वाहिली दोन्ही मडकी होती ...
त्या राखेचा स्पर्श होताच कळल
दूसरी राख़ तिची होती ...
ज्यांच्या असण्याला अर्थ असतो त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते
Friday, March 26, 2010
स्वप्न पाहिली आकाशाची
भूमीच आली हाती
समजत नाही हे जीवन
आपण जगतोय कशासाठी?
मनाला जेव्हा शुद्ध आली
तेव्हा सापडली वाट
वाट कसली हो ती
जिला नाही कोणताच माप
ठरवलय मी आता
असच चालत रहायच
वाटेत आलेले दगड सोडून
प्रवाहा बरोबर वहायच
पहायचय हे जीवन
आपणास नेहते तरी जिथे
मिळेल का एखादा विसावा
या थकलेल्या मनास तिथे "
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)